इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट नक्कीच बिघडले आहे. परंतु, एका बाजूला पेट्रोलचे भाव वाढत असले तरी दुसऱ्या बाजूला इलेकट्रीक बाईक्सच मार्केट हे वाढत आहे.
अतिशय दमदार आणि किफायती इलेकट्रीक बाईक्स भारतात लाँच झाल्या आहेत. त्यातील खालील काही इलेकट्रीक बाईक्सची किंमत आणि फिचर इथे सांगत आहोत. बघा तुम्हाला कुठली बाईक आवडतेय.
Okinawa – आपल्या देशातील स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओकिनावाकडे पाहिले जाते. Ridge ही पहिले इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्याचा वेग ताशी 60 किमी आहे. बाजारात त्याची किंमत 44,990 रुपये आहे. या स्कूटरचे वजन 96 किलो आहे.
Ampere – अँपियरची 48 V-24Ah ची बॅटरी चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तासांचा वेळ लागतो. ही स्कूटर ताशी 25 किमीपर्यंत वेगाने धावू शकते. पूर्ण चार्ज झाल्यानंतर 45 ते 50 किमी पर्यंत जाऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये त्याची किंमत 28,900 ते 37,488 रुपयांपर्यंत आहे. काळ्या, लाल आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे.
Bajaj Chetak – बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात पुन्हा दिमाखदार एन्ट्री करत आली आहे. बजाज चेतकची ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. बजाज चेतकमध्ये 3kWh, लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 95km पर्यंतची जाऊ शकते. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून सुरू होते.
Hero Optima – हिरोच्या ऑप्टिमाला पूर्ण चार्ज करण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. या स्कृटरचा वेग ताशी 25 किमी आहे. सिंगल चार्ज केल्यावर स्कूटर 50 किमीपर्यंत जाऊ शकते. ही मॅट रेड, निळा आणि मॅट ग्रे या 3 रंगात उपलब्ध आहे. स्कूटरला 250W क्षमतेची बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर आहे. याची किंमत 41,770 रुपये आहे.
TVS iQube – इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.4 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर मिळते. याव्यतिरिक्त, ही स्कूटर पूर्ण चार्जिंगमध्ये सुमारे 75 किमी चालते. हीचा ताशी 78 किमी वेग आहे. याव्यतिरिक्त, 6 बीएचपीची शक्ती आणि 140 एनएमची टॉर्क जनरेट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय बाजारात त्याची किंमत सुमारे 1.15 लाख रुपये आहे. 4.2 सेकंदात ताशी 40 km किमी वेग घेते.
[ अशीच महत्वपूर्ण माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करा. त्यासाठी क्लिक करा : https://cutt.ly/Spreadit ]