SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नेहा कक्कर आहे ‘या’ आजाराने त्रस्त; वाचा तिने स्वत:च केलेला खुलासा..

भारतातील बहुतांश लोक अशी असतील ज्यांची नेहा कक्कर ही गायिका आवडती असेल. हे नाव जवळजवळ साऱ्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते.

पण, तुम्हाला माहीती आहे का..?

Advertisement

सर्वांची फेवरेट नेहा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिचा विवाह थाटामाटात पार पडला. काही दिवसच झाले असतील तिने वैवाहिक जीवनाची चांगली सुरुवात केली.

सगळं अगदी चांगलं चाललं होतं..पण नेहाने एका कार्यक्रमात तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

नेहाने अनेक शो केले आहेत. तिने जज म्हणून खूप कार्यक्रमात भूमिका पार पाडल्या आहेत. आता ती ‘इंडियन आयडॉल 12 ’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून याच मंचावर तिने अचानक तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे.

गायक-गायिकांच्या या सुरसंग्रामात दिवसेंदिवस उत्साह वाढता ठेवण्याचं काम, आणि स्पर्धेच्या जगात आपलं भविष्य लवकरच या शोमध्ये आईवर आधारित खास भाग होणार आहे. यात नेहा तिच्या आजारपणाविषयी सांगताना दिसत आहे.

Advertisement

नेहाला एंक्झायटी चा आजार असून याविषयी बोलताना ती अत्यंत भावूक झाली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं आणि तिचं हे गाणं ऐकताच नेहा इतकी भावूक झाली की तिने आपली वैयक्तिक समस्या जाहीर केली म्हणजेच एंक्झायटीचा त्रास असल्याचं तिने सांगितलं.

दरम्यान, नेहा बॉलिवूडमधील खास, लोकप्रिय गायिका आहे. अनेकदा नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते व खुलेआम राहत असते. अलिकडेच नेहाने रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा हा खूपच चर्चेत राहिला होता.

Advertisement