SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

🗓️ सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : छोटे प्रवास घडतील. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. व्यवसायात फायदा मिळेल. सुखद आणि आनंददायक असा दिवस राहील.

Advertisement

▪️ वृषभ : गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. अनपेक्षित गाठी भेटी होतील. आपले अंदाज अचूक येतील. करिअरमध्ये पुढे जाल, योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल.

▪️ मिथुन : आपल्या लहरी वागण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक मतभेद टाळा. आरोग्याच्या तक्रारी राहतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. गुंतवणूकीच्या बाबतीत नवे सल्ले मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता.

Advertisement

▪️ कर्क : खर्चाचे प्रमाण कमी होईल. नवीन परिचयातून लाभ होतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. नवी माहिती तुम्हाला प्रोत्साहित करेल. सकारात्मक दृष्टीकोन राहिल.

▪️ सिंह : आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. दिवस चांगला आहे. दुःख नष्ट होतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही फायदा कराल. प्रेमसंबंधामध्ये चांगले बदल होणार.

Advertisement

▪️ कन्या : आपण घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. आपले कार्यक्षेत्र वाढेल. चांगल्या बोलण्याने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वपूर्ण बोलणी आणि मुलाखती यशस्वी होतील.

▪️ तूळ : परदेशातील नातेवाईकांशी संपर्क होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल.

Advertisement

▪️ वृश्चिक : हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल. मोठ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

▪️ धनू : पूर्वी केलेल्या कामाची नोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. तणावापासून लांब जाण्यासाठी संगीत ऐका. अर्थिक परिस्थिती उत्तम राहील. दिवस व्यस्त असेल.

Advertisement

▪️ मकर : मिष्टान्न भोजनाचा योग आहे. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. दिवसाची सुरूवात थोडी त्रासदायक आहे, मात्र शेवट चांगला आहे.

▪️ कुंभ : नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार असाल तर यश निश्चित. आपले निर्णय योग्य ठरतील. घरात काही बदल करण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. जीवनसाथीचे विचार समजून घ्या.

Advertisement

▪️ मीन : संतसज्जनांचा सहवास लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. कर्तृत्त्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्ताव येतील.

Advertisement