SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कसा असेल तुमचा रविवार, जाणून घ्या राशीफलच्या माध्यमातून

🗓️ शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : लोकांना तुमच्या हुशारीचा अनुभव येईल. उत्तमरित्या कर्तव्य पार पाडाल. अडचण नष्ट होईल. पैशांची अडचण भासेल. नवीन नाती प्रेम देतील आणि अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील.

Advertisement

▪️ वृषभ : कोणालाही विरोध करणं व्यर्थ. झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला तिच्याच भ्रमात राहुद्या. कुटुंबात जास्त लक्ष घाला. खरेदीमध्ये जास्त पैसे जातील म्हणून अनावश्यक खरेदी टाळा. वेळेचे योग्य नियोजन करून महत्वाची कामे पूर्ण होतील, असे बघा.

▪️ मिथुन : आपल्याला असणाऱ्या व्याधी दुर्लक्ष केल्यास जास्त नुकसान होईल. मने जिंकता येतील, असं वागा. उद्योगधंद्यात यश मिळेल असे प्रयत्न राहतील. अधिक उपयोगी वस्तु खरेदी कराल. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

Advertisement

▪️ कर्क : मानसिक आरोग्य दूषित विचारांनी बाधित राहील. लिखाणात, वाचनात, कलेत चांगली प्रगती करता येईल. आध्यात्मिक वाचन कराल. जीवनसाथीच्या स्वभावाची आवड निर्माण होईल. थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.

▪️ सिंह : शेअर बाजारच्या कामातून फायदा होईल. पैजा जिंकता येतील. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. संध्याकाळी आनंददायक बातमी मिळेल. कार्यक्रम, शुभमंगलप्रसंगी बाहेर जाण्याची संधी मिळेल.

Advertisement

▪️ कन्या : आकर्षण म्हणजे प्रेम नसते म्हणून बळी पडू नका. उत्तम गृहिणीकडे वाटचाल असेल, गोडीने संसार करणं आपल्या आयुष्यातच आहे. मुलांचा हट्ट पुरवाल. जुनी संपत्ती प्राप्त झाल्यामुळे अहंकार नक्की वाढेल.

▪️ तूळ : लोकांच्या कामात, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्जासारख्या क्षणिक उपयांमध्ये अडकू नका. विनाकारण वाद वाढू शकतो. बिघडलेली कामे आज वेळेत पूर्ण होतील.

Advertisement

▪️ वृश्चिक : गप्पा मारण्याची सवय कमी होईल, पण तात्पुरती आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो, पण तोट्याकडे दुर्लक्ष कराल. वातावरणातील सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढा, म्हणजे शांत वाटेल. वादात अडकून राहू नका अडकण्याची भीती आहे.

▪️ धनू : प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. पोटाचे विकार जाणवतील. कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. चांगली बातमी मिळण्याची शक्यता मिळेल.

Advertisement

▪️ मकर : आळसात दिवस जाईल, काळजी घ्या. मित्रांची मदत घेता येईल. तंबाखू, गुटखा, सिगरेट यांच्या व्यसनाचे नुकसान इतरांना सांगण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला सगळ्या बाबतीत फायदा होईल. महत्त्वाची कामे संथ गतीने होतील.

▪️ कुंभ : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना हात सैल सोडाल. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हाल. प्रवासात व्यत्यय येईल. अर्थप्राप्ती जोमाने होईल. उत्साहात अजून भर पडेल.

Advertisement

▪️ मीन : मनातील नजरात्मक विचार काढून टाका. देवावर श्रद्धा ठेवाल. पुरुषांना त्यांच्या कामात स्त्रियांची मदत मिळेल. अचूक ठिकाणी केलेल्या खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल. मुलाकडून तुमच्या मनाला शांती मिळेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग: आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement