SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुनर्जन्म खरंच असतो का? तुम्हीच वाचा आणि ठरवा..

आपल्यातील अनेक जण असं म्हणतात की, विज्ञान पुनर्जन्म मानत नाही पण तरीही पुनर्जन्माचे अनेक किस्से आपल्या आयुष्यात सांगितले जातात. तसेच, पुनर्जन्म विषयावर अनेक चित्रपट, नाटके, मालिका येतात आणि ते प्रसिद्धीत येऊन गाजतात.

आता तुम्हीच बघा ना..

Advertisement

आता काही दिवसांपूर्वी देशात एक गोष्ट वाऱ्यासारखी पसरत होती. भूटानचा एक ‘युवराज’ नावाचा मुलगा 3 वर्षाचा असताना भारतात आला आणि त्याने नालंदा येथील त्याच्या त्याच्या मागच्या जन्मातील अनेक ठिकाणे दाखविली याच्या बातम्या झळकल्या होत्या.

आता असं कसं होऊ शकतं, तर हे पुरावेच सिद्ध करत आहेत की पुनर्जन्म असतो हे या उदाहरणाने सिद्ध केले, याचे पुरावे मिळाले आहेत. आता याच्या बाबतीत आपलं तत्वज्ञान जे सांगेल ते राहिलंच !

Advertisement

असंच काहीतरी..

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बलबीरसिंग यांची मुलगी अमृता हिने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मागील जन्मातील गावाला जाऊन ते जे सांगत आहेत त्याची प्रत्यक्ष चाचपणी केली असता, तेथील वयोवृद्ध माणसांची भेट घेऊन त्यावर पास्ट फॉरवर्ड नावाचे 425 पानी पुस्तक प्रकाशित केले आहे.

Advertisement

यानुसार बलबीर सिंग हे 96 वर्षीय वयाचे असून धर्माने शीख आहेत मात्र वयाच्या 3-4 वर्षापासून ते त्यांचा पूर्वीचा जन्म पाकिस्तानात दिंगा शहरात झाला आणि त्यांचे नाव बहादूर सुंदरदास चोपडा असल्याचे त्यांना आठवत होते.

बलबीर सिंग यांचा जन्म रायबरेली या ठिकाणी झाला व त्यांना 9 भावंडे होती. त्यांचे वडील हे रेल्वे खात्यात उच्च पदावर होते व त्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या होत व्हायच्या.

Advertisement

एकदा ते लहान असताना त्यांचे कुटुंब लग्नाच्या निमित्ताने दिन्गा गावी गेले तेव्हा ते आईच्या कडेवरून उतरले आणि समोर असलेल्या महालात घुसले. तेथे अनेक खोल्या पार करून ते एका खोलीत गेले आणि तेथील पियानो ओळखला.

तसेच आपले नाव बहादूर सुंदरदास असल्याचं सांगून त्यांनी त्या वेळेसच्या अनेक घटना बरोबर सांगितल्या. गतजन्मात ते ब्रिटीश सेनेला रेशन आणि युनि फॉर्मचा पुरवठा करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी ते खूपच लहान असल्याने त्यांची आई घाबरली व पुढच्या आयुष्यात कधीही पुन्हा या गावी गेली नाही.

Advertisement

सध्या हि हवेली साजिद याच्या मालकीची असून त्यांनी बलबीर ज्या आठवणी सांगत होते त्या खऱ्या असल्याचे सांगितले. बलबीर यांची मुलगी अमृता हिने या गावात जाऊन मुक्काम केला. वडील सांगत असलेल्या अनेक आठवणींची खात्री अनेक लोकांशी बोलून करून घेतली. वडिलांच्या गतजन्मातील कुटुंबाचा शोध घेऊन त्या व्यक्तीशी बोलणी केली आणि नंतर या अनुभवावरचे पुस्तक प्रकाशित केले.

Advertisement