SpreadIt News | Digital Newspaper

पावसातल्या सभेला शरद पवार कारणीभूत नाहीत, तर ती व्यक्ती वेगळीच.. सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित सांगितलं!

0

2019 च्या निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये 80 वर्षांचे तरुण म्हणजेच शरद पवार यांचा जबरदस्त व्हायरल झालेला पावसातील भाषणाचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या पावसातील भाषणाचा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड फायदा झाला आणि लोकांनी राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना कौल देत निवडून आणलं.

आता ताज्या बातम्या आणि माहिती मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर, लगेच जॉईन करा

परंतु, धो धो पाऊस सुरु असताना हि सभा कशी झाली, त्याला नेमकं कारणीभूत कोण आहे हा पूर्ण किस्सा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत राष्ट्रवा

Advertisement

दीच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना सांगितला.

Advertisement

सुप्रिया सुळे यांनी पावसातील सभेविषयी नेमकं काय गुपित सांगितलं आणि कोण आहे ती व्यक्ती ज्यामुळे हि सभा घडून आली?

“साताऱ्यातील त्या सभेला शरद पवार नाही तर शशिकांत शिंदे जबाबदार आहेत. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. साताऱ्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे सभा रद्द करण्याच्या विचार सुरु होता. संध्याकाळच्या सुमारास मला शिंदे यांचा फोन आला. मी प्रचारात होते त्यामुळे त्यांचा फोन घेतला नाही. नंतर त्यांना फोन केल्यावर ते म्हणले की, ताई मी सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता. मला प्रश्न पडला की साहेब तर साताऱ्यात आहेत. मग हे असं का बोलत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई सभा झाली, पवार साहेब पूर्ण भिजले. मी कपाळाला हातच लावला. मी म्हणलं, अहो असं काय करताय. माझे वडील 80 वर्षांचे, पायाला जखम झाली आहे. तेव्हा ते म्हणाले मी आणि साहेबांनी ठरवलं की सभा करायचीच. मग काय झालं असं विचारल्यावर ते म्हणाले की, काही नाही सभा झाली. साहेब भिजले. आता साहेब तयार झालेत आणि माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय. हे सगळं ऐकून मी पूर्ण शॉक होते”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं चित्र पालटवणारी साताऱ्यातील ती सभा ही शशिकांत शिंदे यांनी घडवून आणल्याचं आज सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Advertisement

… आणि रोहित पवारांचे हि आजोबांच्या पावलावर पाऊल, त्यांनी हि केले भर पावसात भाषण

रोहित पवारांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भर पावसात भाषण केलं. उपस्थितांनी देखील पावसात उभं राहून हे भाषण ऐकलं. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण काढली जातेय. रोहित पवार यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधन करत त्यांच्या उपक्रमांचं कौतुकही केलं. हा शिवजयंती कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग: आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement