SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : आजच्या दिवशी काम करताना डोक्यावर फार ताण येऊ शकतो. तर आज खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. आज प्रत्येक कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.

Advertisement

▪️ वृषभ : मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आज आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.

▪️ मिथुन : घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होऊ शकते. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. आज स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

Advertisement

▪️ कर्क : विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ खाण्याचा योग येईल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठीभेटी होण्याची शक्यता.

▪️ सिंह : आजच्या दिवशी स्वत:वर पूर्णपणे आत्मविश्वास ठेवा. आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

Advertisement

▪️ कन्या : वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

▪️ तूळ : आजच्या दिवशी आपल्या व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकतो हे नक्की. आज नातेसंबंध आणखी दृढ होतील.

Advertisement

▪️ वृश्चिक : नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.

▪️ धनू : आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.

Advertisement

▪️ मकर : आज होणाऱ्या गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.

▪️ कुंभ : काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

Advertisement

▪️ मीन : स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement