Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या रायगडावर ‘तशी’ रोषणाई करणं अपमानास्पद; छत्रपती संभाजीराजे कडाडले…

0

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात. तरुणाईचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती..!

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून, सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

रायगडावरील रोषणाईवरून तीव्र नाराजी-

शिवजयंती सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडही सज्ज झाला आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही रंगीबेरंगी रोषणाई विचित्र आणि अपमानजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, ‘भारतीय पुरातत्त्व विभागानं, 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना (लाईटिंग) केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि शिवरायांच्या महान वारशाचा अपमान करणारी आहे.

“भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,’ असंही संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Advertisement

‘पुरातत्व खात्याचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाशयोजना केल्यामुळं हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,’ असंही त्यांनी पुढं नमूद केलं आहे.

Advertisement

Leave a Reply