पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन काहीतरी उलगडा होताना दिसत आहे. अशातच आता अखेर पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.
गेल्या 10 दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. या प्रकरणात एकूण 3 पथकं कसून चौकशी करत आहेत. याआधी पूजाच्या आई-वडिलांची चौकशी केली गेली आहे.
या चौकशीसोबतच आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पण खरं म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. तर आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी असल्याची माहिती आहे.
नक्की काय आहे ‘हे’ प्रकरण ?
परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप सगकीकडून होत आहे.
त्यानंतर काही दिवसातच या आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती आणि यामुळे आता राजकीय वळणावर हे प्रकरण येऊन थांबलं आहे. हे प्रकरण अतिशय वेगाने पसरत आहे, कारण पूजा चव्हाण आणि एका मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार..
पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून (डिप्रेशन) आत्महत्या केली आहे. तर तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आह तर पूजाने आत्महत्या केल्याचा उल्लेख नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit