SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 ‘आयपीएल’ लिलावाची आज रणधुमाळी! आयपीएल लिलावासंदर्भात ‘या’ महत्वाच्या गोष्टी घ्या जाणून…

👉 इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच ‘आयपीएल’च्या 14 व्या हंगामासाठी आपापल्या संघांची सर्वोत्तम बांधणी करण्याच्या इराद्याने संघमालक आज लिलाव प्रक्रियेच्या रणभूमीत उतरतील. अनेक संघांनी बरेच जुने खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. तर काही संघांनी नव्या दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

😇 चेन्नईत आज होणाऱ्या ‘आयपीएल’च्या लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडूंचे भवितव्य ठरणार असून यापैकी कोणत्या भाग्यवान 61 खेळाडूंना संघमालकांची पसंती मिळणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Advertisement

💁‍♂️ कोणत्या देशाचे किती खेळाडूंचा यात सहभाग होणार?

‘आयपीएल’चा 14वा मोसम एप्रिल महिन्यात देशातच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या वेळी 164 भारतीय, 125 परदेशी आणि तीन संलग्न देशांतील खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. तर आजच्या लिलावात 227 खेळाडू अनकॅप्ड आहेत तर 64 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. मात्र सर्व 8 संघांमध्ये केवळ 61 जागा रिक्त आहेत.

Advertisement

🏌️ रिलीज केलेले खेळाडू :

स्टीव्ह स्मिथ , हरभजन सिंग, शाकिब अल हसन, मोइन अली, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, सॅम बिलिंग्स, मार्क वुड, लियाम प्लंकेट, जेसन रॉय या खेळाडूंना संघांनी रिलीझ केल्याने ते लिलावासाठी उपलब्ध असणार असून या सर्वांची बेस प्राईज प्रत्येकी 2 कोटी रुपये इतकी आहे.

Advertisement

🧐 या युवा खेळाडूंकडे सर्वात जास्त लक्ष्य :

अनेक युवा भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतून आपली प्रतिभा दाखवली असून, यात मोहम्मद अझहरुद्दीन या केरळकडून खेळणाऱ्या खेळाडूनेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. संजू सॅमसन याला आपला रोल मॉडेल मानणाऱ्या मोहम्मद अझहरुद्दीन याने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीदरम्यान सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या स्पर्धेत मुंबई संघाविरुद्ध अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावले होते.

Advertisement

💰 संघ व त्यांच्याकडे असलेली रक्कम :

▪️ पंजाब किंग्ज- 53.20 कोटी
▪️ राजस्थान रॉयल्स- 37.85 कोटी
▪️ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- 35.40 कोटी
▪️ चेन्नई सुपर किंग्ज- 19.90 कोटी
▪️ मुंबई इंडियन्स- 15.35 कोटी
▪️ दिल्ली कॅपिटल्स- 1.40 कोटी
▪️ कोलकाता नाइट रायडर्स- 10.75 कोटी
▪️ सनरायजर्स हैदराबाद- 10.75 कोटी

Advertisement

📍 दरम्यान, कोरोनामुळे यंदा मेगा ऑक्शनऐवजी छोटेखानी मिनी ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी संबंधित सर्व संघांचे महत्वाचे व्यक्ती चेन्नईत दाखल झाले आहेत. आणखी काही दिग्जव्यक्ती येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement