SpreadIt News | Digital Newspaper

करोडोंच्या लिलावात कोणत्या खेळाडूंचे नशीब चमकले? ❗ जाणून घ्या IPL ऑक्शन मध्ये आज काय घडलं? कोणता खेळाडू किती रुपयांना विकला गेला?

0

आयपीएल 2019 ची खेळाडूंची यादी 292 वर जाऊन पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू करोडो ची बोली लागायची वाट पाहत आहेत.

आयपीएल मध्ये फ्रॅंचाईजी म्हणून ज्या टीम आहेत त्यांच्या तिजोरी मध्ये असणारे पैसे आणि खेळाडूंवर लागणारी बोली, याचा ताळमेळ कसा बसतो? आणि कोणत्या खेळाडूच्या नशिबी काय येते? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement

आधी आपण जाणून घेऊया फ्रॅंचाईजीच्या यादी मध्ये कोणत्या टीम उतरल्या आहेत.

यामध्ये चेन्नई सुपर किंग्स 19.9 कोटी रुपये घेऊन उतरली आहे. तर मुंबई इंडियन्स कडे 15. 35 कोटी आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमकडे 35.4 कोटी रुपये आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद ने 10.75 कोटी रुपये स्वतःजवळ ठेवले आहेत.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स कडे 13.4 कोटी पंजाब कडे 53.2 कोटी राजस्थान रॉयल्स कडे 37.85 कोटी तर कोलकत्ता नाइट रायडर्स कडे 10.75 कोटी आहेत.

अजूनही आयपीएलचे ऑक्शन चालू आहे. सध्या आपण जाणून घेणार आहोत, करोडोंच्या बोलीवर कोणत्या संघामध्ये कोणता खेळाडू गेला आहे.

Advertisement

स्टीव्ह स्मिथ या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्स ने 2.2 कोटी देऊन खरेदी केले आहे.

ग्लेन मॅक्सवेल हा खेळाडू, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून 14.25 कोटी ला खरेदी केला गेला आहे.

Advertisement

शाकिब अल हसन याला कोलकत्ता नाइट रायडर्स ने 3.2 कोटीला खरेदी केले आहे.

मोईन अली या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने 7 कोटी रुपये मोजून खरेदी केले आहे.

Advertisement

शिवम दुबे या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रुपये दिले आहेत आणि आपल्याकडून खेळायची संधी दिली आहे.

क्रिस मॉरिस या खेळाडूला राजस्थान रॉयल्सकडून 16.25 कोटी रुपये मिळाले आहेत. युवराज सिंगचा सोळा कोटी मध्ये विकल्या जाण्याचा रेकॉर्ड याने मोडला आहे.

Advertisement

डेव्हिड मलान या खेळाडूला पंजाब कडून 1.5 कोटीची ऑफर मिळाली आहे.

मुस्तफिजुर रहमान याला राजस्थान रॉयल्स ने 1 कोटी रुपये दिले आहेत.

Advertisement

आदम मिलन याला मुंबई इंडियन्स ने 3.2 कोटी रुपये देऊन खरेदी केले असून, नाथन ला देखील मुंबई इंडियन्स ने 5 कोटी मध्ये खरेदी केले आहे.

रिचर्डसन पंजाब कडून खेळणार असून त्यासाठी 14 कोटी रुपये त्याने घेतले आहेत.

Advertisement

पियुष चावला हा मुंबई इंडियन्स कडून 2.4 कोटी रुपयात खेळणार असून, उमेश यादव दिल्ली कॅपिटल्स कडून 1 कोटी रुपयांमध्ये खेळेल.

सचिन बेबी हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून 20 लाखात खेळणार आहे तर राज्यात पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स कडूनच 20 लाखात खेळणार आहे.

Advertisement

रिपल पटेल दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात खेळणार आहे तर शाहरुख खान हा पंजाब कडून 5.25 कोटी मध्ये खेळणार आहे.

के गोथम चेन्नई सुपर किंग्स कडून 9.25 कोटी मध्ये तर विष्णू विनोद हा दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात खेळणार आहे.

Advertisement

शेल्डन जॅक्सन हा कोलकत्ता नाइट रायडर्स कडून 20 लाखात, मोहम्मद अजहरुद्दिन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून 20 लाखात, लुकमन मेरीवाला दिल्ली कॅपिटल्स कडून 20 लाखात तर चेतन साक्रीया राजस्थान रॉयल्सकडून 1.2 कोटी मध्ये खेळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement