SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गजा मारणे’ नावाचा कुख्यात गुंड तुम्हाला अजूनही माहीत नसेल कोण आहे, तर ‘हे’ एकदा वाचाच…

कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे सोमवारी (ता.15) सायंकाळी मुंबईतील तळोजा करागृहातून सुटल्यानंतर त्याच्या गुंड समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या 200 साथीदाराविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.16) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मारणेसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकी 27 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

Advertisement

..आणि गजा गुन्हेगारीकडे वळाला

कुख्यात गजा ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे मुळशीतील एका छोट्या गावातील तरुण. काही वर्षापूर्वी गजा मारणेचे कुटुंब कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आले.

Advertisement

मग काही वेळेतच गजा मारणे गुन्हेगारीकडे वळाला. त्यावेळी गजाकडून पहिला खून पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेल्या व पुणे शहरात मोठे नाव असलेल्या मिलिंद ढोले यांचा झाला. या घटनेत त्याला अटक झाली. हा खून वर्चस्व वादातून झाला. गुन्हेगारी जगतात गजाचा प्रवेश झाला अन तो पोलिसांच्या हिटलिस्टवर आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार..

Advertisement

या कालावधीत गजावर शहरात आणि जिल्ह्यात किरकोळ आरोप हे सुरूच होते. याच दरम्यान त्याला शहरातील एका राजकीय व्यक्तीचा पाठिंबा मिळाला. त्या राजकीय व्यक्तीचा 2004 साली गोळ्या घालून निर्घृण खून झाला.

त्या खुनामध्ये मुंबईतील टोळीचा हात होता. त्यावेळी राजकीय व्यक्तीचा विश्वासू साथीदार असलेल्या बबलू कावेडीयाचा याचा त्या खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 2006 सारसबाग परिसरातील एका हेल्थक्लबमध्ये कावेडीया आला असताना त्याच्यावर फिल्डींग लावून गजा मारणे टोळीने त्याचा खून केला. त्या आरोपातही त्याला अटक झाली. यामुळे गजा आणखी पोलिसांच्या हिटलिस्टवर आला.

Advertisement

ताबेमारी, खंडणीसारख्या प्रकारातून मुळशीत मारणे टोळीने शिरकाव करून आपले बस्तान बसवले. मिलिंद ढोले आणि बबलू कावेडीया खून प्रकरणात गजाला न्यायालयाने निर्दोष सोडले. एकेकाळी त्याचा जिवलग मित्र असलेला निलेश घायवळ त्याच्या घरापासून काही अंतरावर राहण्यास होता. तो देखील त्या काळात त्याच्या टोळीतील सदस्य होता.

परंतु, निलेश आणि घायवळ यांच्यात वर्चस्ववादातून वाद सुरू झाले. पोलिसांकडील उपलब्ध माहितीनुसार निलेश हा कोथरूड येथील गांधीभवन परिसरातून जात असताना गजाच्या आणखी जवळ आलेल्या त्याच्या टोळीतील एक पप्पू कुडले आणि त्याच्या साथीदारांनी निलेशवर सपासप वार करून त्याच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात निलेशच्या डोक्यावर घाव होऊनसुद्धा बचावला. परंतु याचा बदला घेण्याचाही प्लॅन निलेशकडून आखण्यात आल्याचं कळतंय.

Advertisement

एके दिवशी पप्पू कुडलेचा भाऊ सचिन कुडले दत्तवाडी परिसरात आला असताना दहशत निर्माण करण्यासाठी सचिन कुडलेवर निलेशच्या टोळीने अचानक गोळीबार केला. दांडेकर पुलापर्यंत हा गोळीबार सुरू होता. यात एक गोळी सचिन कुडलेला लागली. त्यामध्ये सचिन कुडलेचा खून झाला. त्यामुळे शहरात दहशत आणखीच वाढली.

याच दरम्यान गजाच्या पत्नीने नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्यात त्या निवडूनही आल्या. अशा पद्धतीने गजाचा जोरदार राजकीय प्रवेश झाला. त्यानंतर निलेशच्या जवळ असलेल्या गुंड पप्पू गावडेचा जमिनीच्या वादातून गजा मारणेच्या टोळीने खून केला. तर गुंड अमोल बधेलाही फिल्मीस्टाईलने गाठून वैकुंठ स्मशान भूमीपाशी गोळ्या झाडून गजा मारणेच्या टोळीने ठार केल्याबद्दल आरोप केला गेला.

Advertisement

गजा आणि त्याचा साथीदार बरेच दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होते. या दोन्ही खुनाच्या आरोपात त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. शेवटी तो मुंबई पोलिसाच्या हाती लागला. तेव्हा पासून तो गेली 5 ते 6 वर्ष कारागृहातच होता. या दोन्ही आरोपात साक्षी, पुराव्यांअभावी त्याची आणि त्याच्या टोळीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु, कारागृहातून बाहेर येताना काढण्यात आलेली मिरवणूक त्याला चांगलीच भोवली आणि तो पुन्हा पोलिस जाळ्यात अडकला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement