SpreadIt News | Digital Newspaper

📝 10वी, 12वी परीक्षांच्या तारखा बदलल्या, ‘असं’ आहे नवीन वेळापत्रक..

0

📋 कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे.

💁🏻‍♂️ नवीन वेळापत्रक-

Advertisement

▪️ दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या 10वी, 12वी च्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत.

▪️ 10वी ची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

Advertisement

▪️ 12वी ची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 दरम्यान होणार आहे.

▪️ मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.

Advertisement

📍 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement