SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोड्रिंक्समध्ये टाकले गुंगीचे औषध; विवाहितेसोबत बँकेतच घडला ‘तो’ प्रकार

मुंबई 

आजवर आपण अनेकदा अशा घटना पाहत असतो, जिथे पैशांचे आमिष देऊन भुलवले जाते. आणि त्यानंतर महिलांसोबत जे घडते ते धक्कादायक असते. या घटना शहरात आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणार्‍या समाजात घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

Advertisement

एका ३८ वर्षीय महिलेवर बॅंक व्यवस्थापकाने तब्बल 3 वर्षे अत्याचार सहन केला आणि अखेरीस तिने जाचाला कंटाळून अत्याचार व अॅक्ट्रासीटीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुटीच्या दिवशी बँकेत कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी ३८ वर्षीय महिलेला बॅंक व्यवस्थापकाने बोलावले. आणि तिथे तिला कोड्रिंक्स प्यायला दिले. ज्यात गुंगीचे औषध टाकलेले होते.

यानंतर सदर बॅंक व्यवस्थापकाने तिचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. महिला शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देताच त्याने देखील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हा बँक व्यवस्थापकाने सलग 3 वर्षे तिच्यावर अत्याचार करत राहिला.

Advertisement

एवढेच नाही तर सदर महिला दुसर्‍या शहरात राहायला गेल्यावर तिथे जाऊनही लॉजवर 8 वेळा तिच्यावर अत्याचार केले. शेवटी या महिलेला इतके ब्लॅकमेल केले की, तिला घटस्फोट घ्यायला भाग पाडले. स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सिताराम शर्मा (रा. मुंबई) याच्याविरुद्ध आता महिलेने तक्रार केली आहे.

अखेर या पिडीत महिलेने सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा तपास करीत आहेत

Advertisement