Take a fresh look at your lifestyle.

4 वेळा प्रेम होऊनही ‘त्या’ कारणामुळे रतन टाटा राहिले आयुष्यभर अविवाहित; वाचा, त्यांनीच सांगितलेली ‘ही’ कहाणी..

0

रतन टाटा हे आज जगभरात लाखो, कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणा आहेत. टाटा हे देशाचे असे एक रत्न आहेत, ज्यांच्यासोबत गरिबातला गरीब माणूसही जोडला गेलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, प्रचंड श्रीमंत असूनही त्यांनी लग्न का नाही केले?
त्यांना प्रेम झाले नसेल का?

एका ठिकाणी खुद्द रतन टाटांनीच केलं भाष्य..

Advertisement

मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, मी आयुष्यात तब्बल 4 वेळा प्रेमात पडलो होतो. आणि ते कधीच खोटे नव्हते. मी कायम खरे प्रेम केले कारण मी प्रेम करताना काम लग्न करण्याचे विचार करायचो.

जेव्हा ते अमेरिकेत राहत होते तेव्हा ते प्रेमाबाबत सर्वात जास्त गंभीर होते. ते प्रकरण इतके गंभीर होते की, दोघांनाही लग्न करायचे होते. पण रतन टाटा यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि बसलेली घडी कायमची फिसकटली.

Advertisement

आपल्याला देशात परत यायचे होते पण त्यांच्या प्रेयसीला अमेरिकेतच राहायचे होते आणि यामुळेच त्यांची साथ कायमची सुटली. अशीच पुढच्या 3 वेळेसही काही ना काही समस्या येत राहिल्या आणि टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले.

त्यांना अविवाहित राहण्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही. ते म्हणाले की, मी अविवाहित राहिलो हेच खूप बरं झालं. कारण जर त्यांनी लग्न केले असते तर कदाचित ही परिस्थिती अजूनच बिघडली असती.

Advertisement

देशाचे रत्न रतन टाटा यांच्यासारखे अनेक तरुण आजकाल अविवाहित राहतात. ठरवून अविवाहित राहूनही चांगले आणि मनासारखे जीवन जगता येते, हे रतन टाटांनी दाखवून दिले.

Advertisement

Leave a Reply