SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: अखेर वनमंत्री संजय राठोडांचा राजीनामा; उलटसुलट चर्चांना उधाण !

महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता एका मंत्र्याचं नाव चर्चेत आलं आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापत चाललं आहे.

प्रकरण आता पेट घेण्याची शक्यता..

Advertisement

शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाणने आत्महत्या केली, असा आरोप भाजपाने केला होता, या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली होती.

आता पूजा चव्हाणच्या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची कळतंय. वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याच्या सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या.

Advertisement

शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह होते. यामुळे मातोश्रीवर आज शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचीच बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.

राजीनामा का द्यावा?

Advertisement

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला असल्याचं कळतंय, निष्पक्ष चौकशीसाठी हा राजीनामा स्वीकारला आहे, शिवसेनेत एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगण्यात येत होतं.

धनंजय मुंडे प्रकरणात त्यांनी राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं? असा प्रश्न काही राजकीय वर्तुळात केलेबजास्त आहेत. तर इथुन पुढे कोणत्याही मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत राहतील, असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे.

Advertisement

पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या झाल्यापासून अज्ञातवासात आहेत, त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नाही, पण बंजारा समाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.

============

Advertisement

😨 कोड्रिंक्समध्ये टाकले गुंगीचे औषध

👀 विवाहितेसोबत बँकेतच घडला ‘तो’ प्रकार, वाचा सविस्तर 👉 https://cutt.ly/Zk1URVz

Advertisement

============
मुख्यमंत्र्याचा अप्रत्यक्ष कडक इशारा-

काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे अतिशय गंभीर आरोप केले होते, त्यानंतर लगेच आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येशी जोडलं गेलं आहे, त्यामुळे शिवसेनेची आणि सरकारची नामुष्की होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे विरोधकांना कडक इशाराच दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement