SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“पूजाने 25 लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं, कोरोनामुळे सगळंच नाहीसं झालं”, वाचा.. पूजाच्या वडिलांनी मांडलेली वेदनादायक परिस्थिती

पुणे शहरातील हडपसर भागातील रविवारी (दि. 7) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत प्रेमसंबंध होते व प्रेमसंबंधातूनच या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

घटनेविषयी पूजाच्या वडिलांचं मत..

Advertisement

या संवेदनशील घडनेबाबत पूजाचे वडील यांनी “आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास होता, त्यामुळे आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही, असे कोणतेही कृत्य करणार नाही. तरी लोकांनी आमच्या मुलीच्या आत्महत्येचे राजकारण थांबवा”, असे आवाहन केलंय.

त्यासोबतच, ‘पूजाने बँकेतून 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, कोरोनामुळे परिस्थिती अतिशय बिकट होत गेली’, असंही त्यांनी सांगितले. वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून 25 ते 30 लाख रुपयांचं लोन काढलं होतं, या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् सगळं जे काही होतं तेही गेलं.

Advertisement

“या काळात मागच्या वर्षी कोंबड्या फुकट वाटल्या, तब्बल 25 लाख रुपयांचं मला नुकसान झालं. यात, आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. कसंबसं, आम्ही त्यातूनही उभारलो. पण, बर्ड फ्लू आला अन् पुन्हा आमचा माल केवळ 30 ते 35 रुपये किलोने विकला जाऊ लागला.
त्यामुळे आर्थिक संकटं भारी वेगाने आली. त्यातून पूजाने पुण्याला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी, मी जाताना तिला 25 हजार रुपयेही दिले”, अशी आपबिती पूजाच्या वडिलांनी सांगितली.

दरम्यान, अचानक पूजाच्या मित्राचा कॉल आला की, ती बाल्कनीतून खाली पडली, मग मी तात्काळ पुणे गाठले पण मी तिथं पोहोचण्यापर्यंत तिचा मृत्यू झाला होता, अशी वेदनादायक आपबिती पूजाच्या वडिलांनी सांगितली.

Advertisement

पूजाचे वडील लहू चव्हाण पुढे म्हणाले की..

“माझी मुलगी पूजा, खूप चांगली मुलगी होती,  पण काही लोक तिला उगाच बदनाम करत आहेत. ज्या अफवा पसरत आहेत, तसं काही नाही, लोक म्हणतात राजकीय दबावामुळे तुम्ही बोलत नाही. ज्यावेळी आम्ही पुण्याला गेलो; त्यावेळी आम्ही चौकशी केली. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाकडे विचारणा केली. तेव्हा चक्कर येऊन पूजा खाली पडली असं सांगितले. त्यावेळी मी खाली होतो, असं त्या मुलाने सांगितले त्यामुळे मी कोणावर आरोप करू, तिच्यावर कर्जाचा बोजा होता. उगाच मला बदनाम केले तर मीच आत्महत्या करेन, तेव्हा पूजाच्या आत्महत्येचे राजकारण करू नका”, असे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केले आहे.

Advertisement