SpreadIt News | Digital Newspaper

चारचाकी चालवणार्‍यांनो इकडे द्या लक्ष; अन्यथा भरावा लागेल आर्थिक दंड

0

देशातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर स्पर्शविरहित आणि डिजिटल पेमेंट पद्धतीतून टोल भरण्यासाठी FASTag गरजेचं आहे. चार चाकी खासगी वाहन आणि व्यावसायिक वाहनांना फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी तशी घोषणा केली आहे.

एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोलवर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं.

Advertisement

त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद ठेवण्यात येणार आहेत.

काय आहे ‘फास्टॅग’?

Advertisement

इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी 1 डिसेंबरपासून ‘फास्टॅग’ वापरण्यात येणार आहे. ‘फास्टॅग’च्या माध्यमातून वाहनांना टोलनाक्यावर न थांबता टोल चुकता करता येणार आहे. हा ‘फास्टॅग’ बँकांकडून खरेदी करता येणार आहे. टोलनाक्यावर ऑटोमॅटिक ट्रान्स्जॅक्शनसाठी वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये ‘फास्टॅग’ लावला जातो.

फास्टॅग (FASTag) कसे रजिस्टर कराल?

Advertisement

तुम्ही 22 सर्टिफाईड बँकामधून फास्टॅग मिळवू शकतात. या बँकांमधून पॉईंट ऑफ सेल (POS)च्या माध्यमातून फास्टॅग उपलब्ध होतील. एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब नॅशनल बँकांसह पेटीएम, अॅमेझॉन सारख्या ई-प्लॅटफॉर्मवर फास्टॅग उपलब्ध असणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.

Advertisement