Take a fresh look at your lifestyle.

😱 युवराज सिंगविरोधात FIR दाखल; 8 महिन्यांपूर्वी ‘या’ क्रिकेटपटूंना केली होती शिवीगाळ, वाचा संपूर्ण प्रकरण..

0

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग विरोधात हरीयाणा येथे FIR दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान दलित समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं.

8 महिन्यांनंतर FIR दाखल..

Advertisement

हरीयाणामधील हिसार येथील वकिलांनी 8 महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती. इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार, 8 महिन्यांनंतर हरीयाणा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला आहे.

हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (s) of the SC/ST Act नुसार FIR दाखल झाला आहे.

Advertisement

युवीनं काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर चॅट करताना युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती.

5 जूनला युवराजने ट्विट करून मागितली होती माफी-

Advertisement

लॉकडाऊन काळात युवराज सिंगने भारताचा फलंदाज रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह संवाद साधला होता. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला ‘भंगी’ असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. ”ये भं** लोगो का काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप)” असे युवी रोहितला म्हणाला होता.

युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर ‘
युवराज सिंग माफी माग’ असा ट्रेंड बुधवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर युवीनं माफी मागितली होती.

Advertisement

युवराजने ट्विट केलं की,”माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचं कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो.”

Advertisement

Leave a Reply