SpreadIt News | Digital Newspaper

एअरटेलची जबरदस्त ऑफर.. 6 जीबी डेटा मिळणार फ्री!

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्या नेहमीच काही तरी आकर्षक ऑफर्स काढत असतात. त्यापैकी एअरटेल ची कंपनी सध्या अशीच ऑफर देताना समोर येत आहे. आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे.

या ऑफर नुसार एअरटेल प्रीपेड रिचार्ज वर 6 जीबी पर्यंत डेटा कुपन फ्री मध्ये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे फ्री डेटा कुपन मिळवण्यासाठी 219 रुपयांच्या बेसिक प्रीपेड रिचार्ज 6 इतर कोणताही रिचार्ज करावा लागणार आहे.

Advertisement

यासाठी मात्र युझर्सला एक अट घालण्यात आली आहे 28 दिवसांची वैधता असलेले रिचार्ज तुम्हाला 219, 249, 279, 289, 298, 349, 398, 448 रुपयांच्या अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन्स करावे लागणार आहे.

त्यापुढील 399, 449 पासून 599 रुपयांपर्यंत 56 दिवसांची वैधता असलेले रिचार्ज आहेत. त्यावर तुम्हाला 1 जीबी चे 4 कुपन मिळणार आहेत. म्हणजे 4 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. 84 दिवसाची वैधता 598, 698 रुपयांचा रिचार्ज वर मिळते. त्यावर तुम्हाला 6 डेटा कुपन मिळून 6 जीबी डेटा कुपन्स मिळू शकतील.

Advertisement

युझर्स अकाऊंट मध्ये डेटा कुपन क्रेडिट झाल्यानंतर ऑफरचा लाभ घेण्यासाठी युझर्सला एअरटेल थँक्स मोबाईल ॲप द्वारे प्रीपेड रिचार्ज करणे गरजेचे असणार आहे. यासाठी युजर्स एअरटेल थँक्स ॲप डाउनलोड करू शकतात आणि या सेक्शन मध्ये जाऊन डेटा कुपन रिडीम करू शकतात.

Advertisement