SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏦 SBI बँकेतील ‘या’ योजनेचा फायदा घ्या, गुंतवणूक करा फक्त ‘एवढी’, मिळेल आकर्षक व्याज..

💁🏻‍♂️ भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक असणारी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणत असते. चांगल्या-चांगल्या बचत स्कीम बँकेकडून सादर करण्यात आल्या आहेत, ज्यातून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते.

💸 एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम देखील अशाच योजनांपैकी एक आहे. ही योजना रेकरिंग डिपॉझिट (RD) सारखीच एक स्कीम आहे. मात्र यामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा करण्याची मुभा मिळते. तुम्ही एकाच वेळी अनेक महिन्यांचं पेमेंट करू शकता. यामध्ये इंस्टॉलमेंट अमाऊंट देखील निश्चित नाही. ग्राहक त्यांच्या हिशोबाने ही रक्कम कमी जास्त करू शकतात.

Advertisement

💰 गुंतवणूक किती ?

▪️ एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट या योजनेमध्ये खाते उघडावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्ही कमीतकमी 5000 रुपये जमा करू शकता.

Advertisement

▪️ एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीमचा कमीतकमी कालावधी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष आहे.

▪️ एक इन्स्टॉलमेंट (हफ्ता) भरण्याची कमीतकमी रक्कम 500 रुपये आहे. तुम्ही महिन्यातून कधीही पैसे टाकू शकता.

Advertisement

▪️ व्याजाबद्दल सांगायचं झालं तर, या योजनेत हे फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजाइतकंच आहे. वेळेआधी जर तुम्ही हे खातं बंद केलं तर काही प्रमाणात शुल्क तुम्हाला भरावं लागेल.

📁 खातं कसं उघडाल..?

Advertisement

या आकर्षक योजनेत तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपण नेटबँकिंगचा वापर करून यामध्ये खाते उघडू शकता. देशभरातील अनेकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ही योजना अल्पवयीन मुलांसाठीही उपलब्ध आहे. तुम्ही या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट खाते उघडू शकता. नॉमिनी रजिस्टर करण्यासाठीही तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळेस तुम्ही नॉमिनी रजिस्टर करू शकता.

Advertisement