SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे. योग्य ठिकाणी केलेल्या खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल. मुलाकडून तुमच्या मनाला समाधान मिळेल.

Advertisement

▪️ वृषभ : उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. तुमची कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्य देखील तुम्हाला प्रत्येक प्रकारे मदत करतील.

▪️ मिथुन : जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यवसायात सावधगिरी बाळगा. धोकादायक कार्यांपासून लांब रहा.

Advertisement

▪️ कर्क : मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल. तुम्हाला कोर्टातील खटल्यांमध्ये विजय मिळेल. बायकोच्या बाजूने तुम्हाला फायदा होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल.

▪️ सिंह : शेअर्सच्या कामातून फायदा होईल. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. संध्याकाळी आनंददायक बातमी मिळेल. रात्रीच्या वेळी कोणत्याही शुभ कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळू शकते.

Advertisement

▪️ कन्या : आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. इच्छित संपत्ती प्राप्त झाल्यामुळे मनोबल वाढेल. पत्नी व मुलांच्या बाजूने समाधानकारक बातमी मिळाल्यानंतर मनाला आनंद होईल.

▪️ तूळ : दिवस काहीसा आळसात जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. राजकारणातले सर्व निर्णय तुमच्या बाजूने लागतील. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. सांसारिक सुखांचा विस्तार होईल. पुढे ढकलण्यात आलेली महत्त्वाची कामे वेगवान होतील.

Advertisement

▪️ वृश्चिक : गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल. व्यर्थ वादात अडकून राहू नका नुकसान होऊ शकते. जर खाण्या-पिण्यात सावधगिरी बाळगली तर तुम्हाला लाभ मिळेल आणि कार्य पूर्ण होईल.

▪️ धनू : प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील. मित्रांसह सहलीला जाण्याची योजना होऊ शकते. चांगली बातमी मिळाल्याने मनाला समाधान मिळेल.

Advertisement

▪️ मकर : धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे तुमची कामे बिघडलेली कामे पूर्ण होतील. सहलीला जायचा योग आहे.

▪️ कुंभ : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल. घरात उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. विरोधी पक्षांचा पराभव होईल. नवीन ओळखीचे कायमस्वरूपी मैत्रीत रुपांतर होईल .

Advertisement

▪️मीन : प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. अडचण नष्ट होईल. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पैशांची मदत मिळू शकेल. नाती सुधारतील आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील.

Advertisement