SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💰 प्रत्त्येक महिन्याला खात्यात जमा होणार पैसे, ‘ही’ सरकारी योजना आहे तरी कोणती ? एकदा पाहाच..

📪 पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सरकारी छोटी बचत योजना आहे, जी भारतीय गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित रक्कम मिळवून देते. या योजनेमध्ये एकल किंवा संयुक्त खात्यात एकमुखी रक्कम खात्यात जमा केली जाते. या रकमेनुसार, प्रत्येक महिन्यात आपल्या खात्यात काही पैसे येत असतात.

⌛ या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे, जी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. पोस्ट ऑफिस योजना असल्याने ती पूर्णपणे जोखीम मुक्त आहे आणि सरकार येथे 100% गुंतवणूकीची सुरक्षा हमी देते. म्हणून ही एक सुरक्षित बचत योजना आहे.

Advertisement

🏦 गुंतवणूकीविषयी..

📌 या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आपण भारतीय असणे आवश्यक आहे. ज्या गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसचे मासिक उत्पन्न ही एक चांगली आणि फायदेशीर योजना आहे.

Advertisement

📌 यासोबतच, सेवानिवृत्तीनंतर जर एकरकमी रक्कम मिळाली तर ती रक्कम सुरक्षित ठेवून दरमहा निश्चित रक्कम मिळू शकते.

📌 तुम्हाला हप्त्याऐवजी एकदाच गुंतवणूक करून नियमित परतावा हवा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

Advertisement

🧐 ‘हे’ लक्षात ठेवणं गरजेचं..

▪️ सिंगल आणि जॉईंट खाती उघडण्याची सुविधा पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत आहे.

Advertisement

▪️ सिंगल अकाऊंटमधून जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

▪️ तुमचे जॉईंट अकाऊंट असल्यास तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता.

Advertisement

▪️ संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढ असू शकतात. परंतु आपण जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतो.

💁🏻‍♂️ व्याज किती मिळणार :

Advertisement

चालू तिमाहीत, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी सरकारकडून वार्षिक व्याजदर 7.5 टक्क्यांपर्यंत ठरवला गेला आहे. ही एक गुंतवणुकीची नक्कीच चांगली संधी आहे.

Advertisement