Take a fresh look at your lifestyle.

👨🏻‍🏫 ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले दर्जेदार ‘शाळा’ भरवणार, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे..

0

💁🏻‍♂️ ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते, सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून आता राज्यभर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमामधून आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

🎖️ ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर –

Advertisement

▪️ तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाली असून त्यांना ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत.

▪️ ‘डिसले हे व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या अंतर्गत जगातील 143 हून जास्त देशातील 1400 पेक्षा अधिक शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत.

Advertisement

▪️ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी 16 हजारपेक्षा अधिक शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन केले असून, आता राज्यातील शिक्षकांना त्याचा खूप फायदा होत आहे.

▪️ डिसले यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरु केले आहेत. राज्यातील इतर शिक्षकांनाही डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरविले आहे.

Advertisement

🗣️ मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

👉 या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून राज्यातील अनेक शिक्षकांना नवा आत्मविश्वास, नवीन उमेद मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे राज्यातील सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Advertisement

👉 या उपक्रमाच्या माध्यमातून डिसले यांनी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी व उत्कृष्ट शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील सर्व शाळांनी शिक्षणविषयक नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

👉 रणजितसिंह डिसले यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी, उत्साह वाढावा तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन डिसले या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल होण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Advertisement

Leave a Reply