SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो. तुम्हाला इतरांना मदत करून समाधान मिळते, म्हणून आजचा दिवस परोपकारात जाईल

Advertisement

▪️ वृषभ : सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल. संध्याकाळच्या वेळी एखाद्या आवडत्या व्यक्तीला घरी येताना पाहून आनंद होईल.

▪️ मिथुन : मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका. आज व्यस्तता अधिक असेल. प्रवास करताना आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Advertisement

▪️ कर्क : कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. व्यवसाय योजनांना गती मिळेल. नवीन करार देखील होऊ शकेल. राजकीय प्रतिष्ठा वाढेल

▪️ सिंह : वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. तुम्हाला स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. रखडलेले कामही पुढे जाईल. पचनक्रिया मंदावल्याने पोट खराब होऊ शकते.

Advertisement

▪️ कन्या : पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास रागावर नियंत्रण ठेवा. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

▪️ तूळ : साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल. धावपळ जास्त आसल्याने हवामानाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सावधगिरी बाळगा.

Advertisement

▪️ वृश्चिक : हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील. प्रियजनांना भेटून मनाला आनंद मिळेल. बोलण्यावर संयम न ठेवल्यास प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते.

▪️ धनू : वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे. सांसारिक सुखाच्या साधनात वाढ होईल. पैशाच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. पैसा अडकू शकतो.

Advertisement

▪️ मकर : डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत यश आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याने मनाला समाधान मिळेल.

▪️ कुंभ : वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो. व्यवसायातील वाढती प्रगती आनंददायक असेल. या दिवशी विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचा आनंद होईल.

Advertisement

▪️मीन : जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मालमत्ता खरेदी आणि विक्रीच्या वेळी, त्याच्या कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरतील

Advertisement