Take a fresh look at your lifestyle.

💬 व्हॉट्सअ‍ॅपला भारताचं ‘हे’ अ‍ॅप टक्कर देणार !

0

💁🏻‍♂️ लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी स्वदेशी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप ‘संदेस’ (Sandes) आलं आहे.

📱 काही सरकारी अधिकाऱ्यांनी या अ‍ॅपचा वापर करण्यास सुरूवातही केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने WhatsApp च्या धर्तीवर हे अ‍ॅप बनवण्याची घोषणा केली होती. आता हे अ‍ॅप पूर्ण डेव्हलप झाल्याची माहीती आहे.

Advertisement

🤓 Sandes अ‍ॅप ‘असं’ असू शकतं..

▪️ सध्या Sandes अ‍ॅप काही सरकारी अधिकाऱ्यांना वापरण्यास देण्यात आलं असून अजून अ‍ॅपवर टेस्टिंग सुरू आहे.

Advertisement

▪️ ‘गव्हर्नमेंट इंस्टंट मेसेजिंग सिस्टिम’ अर्थात GIMS च्या वेबसाइटवर (GIMS.gov.in) Sandes अ‍ॅपचा लोगो आहे, यात अशोक चक्र दिसतं.

▪️ सध्या सामान्य युजर्ससाठी अ‍ॅप वापरण्याची परवानगी नाही. या वेबसाइटवर क्लिक केल्यास, ‘सध्या ही सेवा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे’, असा मेसेज दिसतो.

Advertisement

▪️ अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मचा सपोर्ट Sandes अ‍ॅपला असून एखाद्या मॉडर्न चॅटिंग अ‍ॅपप्रमाणेच हे अ‍ॅप डेव्हलप करण्यात आलं आहे.

▪️ Gims.gov.in च्या वेबसाइटवर Sandes बाबत काही माहितीही उपलब्ध आहे. यात साइन-इन LDAP, साइन-इन संदेस ओटीपी आणि संदेस वेब असे 3 पर्याय आहेत.

Advertisement

📍 ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन वाद झाल्यानंतर अनेक युजर्स टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅप्सकडे वळत आहेत. अशात आता लवकरच सरकारने डेव्हलप केलेल्या ‘मेड इन इंडिया’ Sandes अ‍ॅपचाही पर्याय लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply