SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

का झाला भारताचा धक्कादायक पराभव? वाचा क्रिकेट विश्लेषण..

इंग्लंड आणि भारतामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 227 धावांनी विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान होते. मात्र, टीम इंडियाचा दुसरा डाव हा केवळ 191 धावांवर आटोपला त्यामुळे, दुसर्‍या डावात टीम इंडियाकडून विराट कोहलीने आटोकाट प्रयत्न करून देखील इंग्लंड विजयी ठरले.

दुसऱ्या डावात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून विराट कोहली वर सर्वात जास्त जिम्मेदारी होती. विराटने 72 धावा केल्या तर, सलामीवीर असलेला शुभमन याने 50 धावांची खेळी केली. इंग्लंड कडून जेम्स अँडरसन 3 विकेट घेतल्या आणि इथेच भारताचा डाव ढासळायला सुरुवात झाली.

Advertisement

या विजयाने इंग्लंड 1-0 अशी आघाडी घेत पुढे गेला आहे. नेमके चुकले काय याचे जेव्हा परिक्षण झाले. तेव्हा भारताचे पाच प्रमुख खेळाडू चेन्नईमध्ये रंगलेल्या कसोटीत पराभवामागचे कारण ठरले आहेत.

क्रिकेट हा खेळ असा आहे की, जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. मात्र, जेव्हा संघ जिंकतो तेव्हा ती संघाची कामगिरी म्हणून त्याकडे बघितले जाते. जेव्हा संघ हरतो तेव्हा मात्र खेळाडू चुकीचे खेळले असा ठपका आयुष्यभर त्यांच्यावर राहतो.

Advertisement

रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शुभमन गिल, शहाबाज नदीम या पाच जणांवर संघाची जिम्मेदारी जास्त होती आणि त्यांच्याकडून काही अशाच चुका झाल्या ज्यातून संघाला पराजय पत्करावा लागला.

रोहित शर्माने दोन डावांमध्ये मिळून केवळ 18 धावा केल्या भारताच्या पराभवा मागे अपयशी सलामी जोडी असल्याने टीम इंडियासाठी चिंता अधिक वाढली.

Advertisement

शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघेही सलामीला उतरले आणि दोघेही अपयशी खेळीची भागीदारी करताना दिसले. रोहित आणि गेली या दोघांनी पहिल्या डावात 19 आणि दुसऱ्या डावात 25 धावा केल्या. शुभमन ला सुरुवात चांगली मिळाली मात्र, त्या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर झाले नाही. रोहित तर दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला.

विराट कोहली हा कर्णधार म्हणून आणि पहिल्या डावात सुद्धा एक खेळाडू म्हणून अपयशी ठरला. चेन्नई कसोटीच्या चौथ्या डावात त्याने चांगली झुंज दिली आणि अर्धशतक झळकावलं मात्र, त्याच्याकडून जी अपेक्षा होती तेवढी चांगली खेळी तो करू शकला नाही. पहिल्या डावात 48 चेंडूत त्याने 11 धावा केल्या दुसऱ्या डावात 72 धावा करत त्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

मात्र त्यामुळे सामन्याचा निकाल बदलला नाही. या सामन्यात तो कर्णधार म्हणून देखील अपयशी ठरल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होत आहे. पहिल्या डावात गोलंदाजी करताना विराट कडून ज्या फिरकीपटू ना संधी देण्यात आली त्यात कुलदीप यादवला संधी नव्हती. शहाबाज नदीमला संधी दिल्यामुळे मोठा निर्णय चुकल्याचे पडसाद उमटले आणि त्यामुळे सामन्याचा निकाल ही बदलला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर अजिंक्य रहाणे कडून देखील मोठी अपेक्षा होती. टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्यने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मात्र आता निराशा केली आहे. त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करायला यावेळी तो अपयशी ठरला आणि पहिल्या पूर्ण डावात फक्त एक धाव काढून तो बाद झाला. तर दुसऱ्या डावात शून्याच्या पुढेदेखील जाऊ शकला नाही.

Advertisement