SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

⭐ आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस ‘कसा’ असेल जाणून घ्या…

🗓️ सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वरिष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. व्यवसायातून लाभ संभवतो. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील काही अपूर्ण इच्छा आता पूर्ण होतील.

Advertisement

▪️ वृषभ : जोडीदाराविषयीचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. अधिकारी व्यक्तींची अचानक ओळख होईल. कामात गोंधळून जाऊ शकता. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील.

▪️ मिथुन : वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्यावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर घालवण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल, पण कामातून आनंद घ्या.

Advertisement

▪️ कर्क : मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. जमिनीच्या कामात रस घ्याल.

▪️ सिंह : कौटुंबिक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटीपपणाकडे विशेष लक्ष द्या. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनिविषयक कामे पार पडतील.

Advertisement

▪️ कन्या : जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात रस येईल.

▪️ तूळ : आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.

Advertisement

▪️ वृश्चिक : दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. कुटुंबात तुमचे दबदबा राहील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

▪️ धनू : संयम राखणे गरजेचे ठरेल. घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. थोडे धाडस दाखवावे लागेल. खर्चाला अति प्रमाणात होईल शकतात. विचारात जास्त वेळ घालवू नये.

Advertisement

▪️ मकर : संयम लवकर सोडून चालणार नाही. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात अजिबात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे थोडेफार वाचन केले तर मन शांत राहील. काही खर्च अचानक वाढू शकतात.

▪️ कुंभ : कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही खर्च अचानक येवू शकतात.

Advertisement

▪️मीन : तोंडात साखर ठेवून बोलाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळून मिसळून वागाल.

Advertisement