SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🗓️ दिनविशेष, ८ फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं ?

🔰 १७१४ : छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

🔰 १८४९ : रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.

Advertisement

🔰 १८९९ : रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

🔰 १९३१ : महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.

Advertisement

🔰 १९३६ : १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.

🔰 १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

Advertisement

🔰 १९६० : पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

🔰 १९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

Advertisement

🔰 १९९४ : भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.

🔰 २००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

Advertisement

🔰 २०१५ : नीती आयोगाची पहिली बैठक

🔰 १८४४ : भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

Advertisement

🔰 १८९७ : भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

🔰 १९६३ : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.

Advertisement

🔰 १९७१ : मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

Advertisement