SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🌹 रोझ डे: तुमच्या जोडीदाराला गुलाब नेमकं कोणत्या रंगाचा द्यावा? जाणून घ्या..

❤️ येत्या 14 फेब्रुवारीला येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. त्याआधी 7 फेब्रुवारीला म्हणजेच ‘रोझ डे’ च्या दिवशी प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात.

😍 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डे विक सुरु होतो, ज्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे या दिवसांचा समावेश आहे.

Advertisement

😇 ‘रोझ डे’ हा दिवस साजरा करण्यामागे काय कारण आहे..?

🤨 तिसऱ्या शतकात ए. डी. सम्राट क्लॉडियस याने 2 माणसांना मारुन टाकण्याचा आदेश दिला होता. त्या दोघांचेही नाव व्हॅलेंटाईन असे होते. त्यानंतर संत व्हॅलेंटाईनने बहिष्कार केलेल्या प्रेमी युगुलाचे लग्न करुन दिल्याबद्दल त्यांना शिक्षा देण्यात आली होती. त्याच्या या बलिदानाची खूप चर्चा झाली आणि मग प्रेमाचा उत्सव सुरु झाला. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे व्हेलेंटाईन वीकची सुरुवात ‘रोज डे ‘ने झाली यात काहीच शंकाच नाही.

Advertisement

1️⃣ लाल गुलाब- लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे. लाल रंगामध्येच ‘रोमांस’ आणि ‘पॅशन’ आहे. त्यामुळे प्रेमाची भावना थेट व्यक्त करायची असेल तर लाल रंगापेक्षा दुसरा पर्याय नाही.

2️⃣ पिवळा गुलाब- तुमच्या मैत्रीची भावना मोकळी करायची असेल, आनंद, उत्साह जपण्यासाठी पिवळ्या रंगाचं गुलाब द्या. त्यामुळे आजारी व्यक्तीला आजारपणातून लवकर बाहेर पडावं या शुभेच्छा देण्यासाठी पिवळ्या रंगांचं गुलाब दिलं जाते.

Advertisement

3️⃣ गुलाबी गुलाब- गुलाबी रंगाचं गुलाब अत्यंत मोहक दिसतं. या गुलाबाच्या माध्यमातून तुमच्या मनातील भावना पोहचवताना त्यामधून गुलाबी रंगाची छटा जशी गडद होते तसं तुमच्यातील साथीदाराबद्दल कृतज्ञता, जिव्हाळा याची कबुली देता येते. तुमच्यामधलं ‘बेस्ट फ्रेंड’चं नातं या गुलाबातून व्यक्त होतं.

4️⃣ पांढरं गुलाब- पांढरा रंग तुमच्यामधील प्रामाणिकपणा आणि पावित्र्याचं प्रतिक समजलं जातं. प्रेमातील पावित्र्याची कबुली देण्यासाठी पांढरा रंग वापरा. प्रामुख्याने लग्नामध्ये याच कारणासाठी प्रेमाचा नितळपणा दर्शवण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. पांढरं गुलाब म्हणजे ‘I am thinking about you’ असाही अर्थ घेतला जातो.

Advertisement

5️⃣ लॅव्हेंडर गुलाब- लॅव्हेंडर हा रंग दिसायलाही अत्यंत मोहक आहे. या रंगाला पाहून मनात जशा भावना येतात तशाच त्या व्यक्त करण्यासाठी या रंगाचं गुलाब वापरलं जातं. लक्ष वेधून घेणार्‍या व्यक्तिमत्त्वाला तुमच्या मनातील भावना बोलून दाखवायच्या असतील तर या रंगाचा वापर करा.

6️⃣ नारंगी गुलाब- प्राईड, पॅशन आणि आनंद या भावनांचा मिलाफ म्हणजे नारंगी रंगाचं गुलाब. प्रेम, मैत्री, अ‍ॅडमायरेशन देण्यासाठी नारंगी रंग मदत करतो. तुमचा साथीदार तुमच्यासोबत असल्याचा तुम्हांला गर्व असेल तर ती भावना समोरच्या व्यक्तीला नारंगी रंगाच्या गुलाबातून व्यक्त करा.

Advertisement