SpreadIt News | Digital Newspaper

⚛️ राशिभविष्य: कसा असेल तुमचा आजचा दिवस..? तुमच्या राशींवरील प्रभाव जाणून घ्या..

0

▪️मेष – कामकाजात व्यस्त राहाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. महिलांना त्यांच्या कलागुणांना चांगली संधी मिळेल. कौटुंबिक गोष्टींना व कर्तव्याला प्राधान्य द्या. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाजू ठीक राहील.

▪️ वृषभ – कामानिमित्त अचानक प्रवासाचे योग संभवतात. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात मतभेदाचे प्रसंग येणार नाही याची दक्षता घ्या.

Advertisement

▪️ मिथुन – स्थावर-जंगमच्या बाबतीतील प्रश्न सोडविता येतील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आहार-विहारावर नियंत्रण आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

▪️ कर्क – कोर्टकचेरीच्या कामांना चालना मिळेल. काही भाग्यवंतांना दोनाचे चार होण्याची संधी मिळू शकते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ छान राहील. विद्यार्थी वर्गाने अध्ययनातील परिश्रम वाढविल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल. मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा.

Advertisement

▪️ सिंह – सरकारी नियम व कायदा यांचे पालन करा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल.

▪️ कन्या – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

Advertisement

▪️ तूळ- नवनवीन तंत्राचा लाभ घेता येईल. एखाद्या व्यक्तीचा मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. उष्णतेच्या, पोटाच्या विकारांबाबत सावध राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.

▪️ वृश्चिक – आपण घेत असलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळेल. आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. आपली लोकप्रियता वृद्धिंगत होईल. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. तुमचे करिअर नव्या टप्प्यावर नेण्याची आपली धारणा राहील.

Advertisement

▪️ धनू – आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील. नको त्या प्रलोभनात अडकू नका. क्रीडा, तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा काळ छान राहील. प्रलोभने टाळा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. विरोधक गप्प बसतील.

▪️ मकर – कुठल्याही बाबतीत गाफील राहू नका, हा या आठवड्याचा संदेश आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. कामानिमित्त प्रवास योग संभवतात. कौटुंबिक वातावरण लहान-सहान वादाच्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

Advertisement

▪️ कुंभ – आप्तेष्टांशी, मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणे आवश्यक राहील. मुलांच्या भवितव्याचा विचार करा. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. भावी काळासाठी योग्य गुंतवणूक करा. दूरच्या नातलगांच्या संपर्कात राहाल. आरोग्य सांभाळा.

▪️मीन- कर्तव्यदक्ष राहिल्यास आपणास आगळेवेगळे समाधान मिळू शकेल. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या ओळखींचा योग्य ठिकाणी वापर करा. नवीन गोष्टी करण्याचा आपला मानस राहील. डोकेदुखी व डोळ्यांची जळजळ या विकारांपासून सावध राहा.

Advertisement