Take a fresh look at your lifestyle.

😨 ब्रेकिंग: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या गाडीला अपघात, ‘या’ छोट्याशा कारणामुळे अपघात..

0

✊ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन दिल्लीतील आंदोलन स्थळापासून त संसदेपर्यंत सर्वत्र गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशातील रामपूर गावात जात असताना अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

💁🏻‍♂️ मिळालेल्या माहितीनुसार,

Advertisement

📌 प्रियंका गांधी यांच्या गाडीचा वायपर काम करत नव्हता त्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले आणि यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनाही ब्रेक दाबावे लागले आणि यातच गाड्या एकमेकांवर धडकल्या.

📌 आज सकाळी ठीक साडे 6 वाजता प्रियांका गांधी अमरोहाहून रामपूर जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात कोणतीही मानहाणी झालेली नाही. यामध्ये 4 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Advertisement

🚙 रामपूरकडे जाण्याचे कारण काय..?

▪️ 26 जानेवारीला कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. यावेळी उत्तर प्रदेशातील रामपूरचे शेतकरी नवरीत सिंह ट्रॅक्टर पलटल्यामुळे मृत्यूमुखी पडले होते.

Advertisement

▪️ रामपूरकडे 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मृत्यू झालेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबाशी प्रियंका गांधी भेटण्यासाठी निघाल्या होत्या.

▪️ रामपुरकडे जात असताना रस्त्यात हापुडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्यात अपघात झाला. यात एका गाडीचे खूप नुकसान झाले आहे. या अपघातात प्रियांका गांधी यांना कोणतीही इजा झाली नाही.

Advertisement

Leave a Reply