SpreadIt News | Digital Newspaper

👩🏻‍✈️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट कोण आहे..? वाचा प्रेरणादायक प्रवास..!

0

👩🏻 भारतातील स्रिया काही वर्षांपासून दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. स्त्रिया पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून अनोखी कामगिरी निभावत आहेत.

👌 वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी स्वत: ला सिद्ध केले आहे, जिथे आतापर्यंत त्यांची उपस्थिती नगण्य आहे, आता असं कोणतंही क्षेत्र नसेल की तिथे स्त्रिया पोहोचल्या नाहीत.

Advertisement

✈️ देशातील तरुण महिला पायलटचा प्रवास..

▪️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट ही आता जम्मू-काश्मीरची आयशा अजीज बनली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ती व्यायसायिक पायलट बनली आहे. तिला परवाना मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आयशाने 2011 साली स्टुडंट पायलटचं परवाना तिने मिळवला होता.

Advertisement

▪️ आयशा याबाबत सांगते की, “मला फिरायला आवडतं, सोबतच विमानाने प्रवास करणे आणि लोकांना भेटायला मला खूपच आवडतं. म्हणूनच मी पायलट होण्याचं ठरवलं. पायलट बनण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या दृढ असणे महत्वाचे आहे”, असं आयशा सांगते.

▪️ आयशाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. प्रचंड मेहनत करून आपत्कालीन अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर तिने अभ्यास केला. तिने बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे. येथून पायलटचा परवानाही तिला मिळाला.

Advertisement

▪️ वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तिने प्रशिक्षणाच्या काळातही प्रशिक्षणासोबतच आपली शाळा पूर्ण केली. आयशा संपूर्ण आठवडा शाळेत जात असे आणि शनिवार-रविवार दोन दिवशी संपूर्ण दिवस विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेत असे. अगदी मनापासून कष्ट करण्याच्या सवयीने आयशाला आज उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवले.

▪️आयशा अजीजला सिंगल इंजिन 152 आणि 172 विमानांचे उड्डाण करण्याचा चांगला अनुभव आहे. आयशाला तब्बल 200 तासांचं उड्डाण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक पायलटचा परवाना देण्यात आला. आयशाच्या म्हणण्यानुसार, ती सुनीता विल्यम्सला आपला आदर्श मानते. आयशाने तिच्या या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले आहे.

Advertisement