घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सरकारी कर्मचाऱ्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि त्यासाठी योग्य ती मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे दिसत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आता मूळ पगाराच्या शंभर पट रक्कम सरकारकडून त्यांना आधीच दिली जाणार आहे. त्यामुळे घर घेणे त्यांच्यासाठी जरा जास्त सोपे होणार आहे. तुमच्या घराचे बांधकाम सुरू असेल किंवा तुम्ही ते घर घेतले असेल, मोकळी जागा घेतली असेल यावर तुम्हाला घर बांधायचे असेल अशा कोणत्याही परिस्थितीत जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्या मूळ वेतनाच्या शंभर पट रक्कम तुम्हाला आधी मिळू शकते.
तुमच्या मूळ वेतनाच्या शंभर पट किंवा 40 ते 70 लाख या दोन्ही पैकी जी रक्कम कमी असेल ती तुम्हाला मिळणार आहे. ही एवढी मोठी रक्कम सरकार आधीच कर्मचाऱ्यांना देणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरीची 5 वर्षे पूर्ण केली आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी ही सुधारित योजना लागू होणार आहे.
त्यावर 25 लक्षपर्यंतच्या कर्जावर 7 टक्के ते त्याहून अधिक रक्कम असेल तर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर लावला जाणार आहे.
यामध्ये समान रकमेच्या हप्त्यामधून लवकरात लवकर ही रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना फेडावी लागणार आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉http://bit.ly/WhatsApNws1