SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोशल मीडिया देखील येणार कायद्याच्या अखत्यारित; सर्वोच्च न्यायालयाकडून फेसबुक आणि ट्विटर ला नोटीस!

💁‍♀️ खोट्या बातम्या पसरवणे किंवा अफवा पसरवणे यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात काही नतद्रष्ट लोक करताना दिसतात.

👉 यावर अंकुश ठेवण्यासाठी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने फेसबूक आणि ट्विटर ला यासंबंधात आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

Advertisement

🚮 सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोट्या बातम्या काही वेळातच आपोआप डिलीट होतील, अशी प्रणाली सरकारने कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

🔎 केंद्र सरकार, दूरसंचार मंत्रालय, कॉर्पोरेट मंत्रालय, ट्विटर कम्युनिकेशन, फेसबुक इंडियाला म्हणणं मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

ℹ️ जनहित याचिकेतील मुद्दे!

◼️व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह, भडकावू मजकुराबाबत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सॲप या सोशल नेटवर्किंग साईट्स ना जबाबदार धरा.

Advertisement

◼️सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळांतच आपोआप डिलीट होतील, अशा प्रकारची प्रणाली सरकारने कार्यान्वित करावी.

◼️जबाबदार लोकांविरोधात फौजदारी खटला चालवण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा बनवावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉http://bit.ly/WhatsApNws1

Advertisement