Take a fresh look at your lifestyle.

😨 पोलिओऐवजी पाजला सॅनिटायझरचा डोस, ‘कुठे’ घडला हा धक्कादायक प्रकार..?

0

💁🏻‍♂️ पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली असून 2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते.

😳 मात्र काल यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी येथे पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान 12 बालकांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायझरचा डोस पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या बालकांवर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

🤕 सॅनिटायझर पाजल्याने झाला ‘हा’ त्रास –

▪️ यवतमाळ जिल्ह्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत रविवारी कापसी कोपरी गावात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

Advertisement

▪️ यादरम्यान गिरीश गेडाम, योगीश्री गेडाम, अंश मेश्राम, हर्ष मेश्राम, भावना आरके, वेदांत मेश्राम, राधिका मेश्राम, प्राची मेश्राम, माही मेश्राम, तनुज मेश्राम, निशा मेश्राम, आस्था मेश्राम या बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आले.

▪️ यानंतर काही तासांतच या मुलांना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या मुलांचे आई-वडील घाबरले. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांना तात्काळ यवतमाळच्या वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement

▪️ सदर घटनेची माहिती मिळताच रात्री 12 वाजता जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची पाहणी केली. नंतर बालकांना तातडीने पोलिओ लस देण्यात आली.

🧐 काय चुकलं..?

Advertisement

गावात लसीकरणादरम्यान हजर असलेल्या आशा, अंगणवाडी सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात आली, परंतू लक्षात आल्यानंतरही त्यांनी चूक सुधारली नाही. या 12 चिमुकल्या बालकांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास सुरू झाल्यावर ही बाब सगळ्यांच्या लक्षात आली. या धक्कादायक प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून चौकशी सुरू आहे.

🗣️ मंत्री बच्चू कडू यांनी ट्विट करत म्हणाले की, “यवतमाळ जिल्ह्यातील कापसी कोपरी या आरोग्य केंद्रावर पोलीओऐवजी सॅनिटायझर पाजण्याचा प्रकार घडला. या हलगर्जीपणा मुळे 12 लहान बाळांचे जिव धोक्यात आले.स्थानीक प्रशासनास संपर्क करुन संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.”

Advertisement

Leave a Reply