Take a fresh look at your lifestyle.

भारतीय शास्त्रज्ञ जगात भारी; कॅन्सरवरील संशोधनात प्रथम क्रमांकाचा बहुमान !

0

🔬 नॅनो टेक्‍नॉलॉजी, आयुर्वेद आणि लेझर अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या जोडीने कर्करोग व संसर्गजन्य रोग या दोन्ही आजारांवर एकाच प्रभावी उपचार पद्धतीचे संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांच्या संशोधनाला युरोपीयन युनियन कमिशनने ‘ब्राइट साइड ऑफ 2020’ हा सर्वोत्कृष्ट संशोधनाचा पहिल्या क्रमांकाचा बहुमान देऊन गाैरविले.

🤝 ’18 मार्च’ला पुरस्काराचे ऑनलाईन वितरण-

Advertisement

📌 मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी येथील डॉ.थोरात इंग्लंड येथे ऑक्‍सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सहकाऱ्यांसह 2016 ते 2020 या 4 वर्षांत युरोपीयन कमिशनच्या अर्थसाहाय्याने ‘नॅनोकार्गो’ हा संशोधन प्रकल्प राबविला. 

📌 2020 मध्ये युरोपीयन युनियन आणि युरोपीयन कमिशनने मानवी जीवन सुखकर करणारे संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील 10 सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प जाहीर केले.

Advertisement

📌 त्यात प्रथम क्रमांकाचा मान डॉ.थोरात यांच्या संशोधनास मिळाला. डिसेंबर, 2020 अखेर या पुरस्कारांची घोषणा झाली. 18 मार्चला पुरस्काराचे ऑनलाईन वितरण होणार आहे.

💁🏻‍♂️ उपचार पद्धतीविषयी..

Advertisement

▪️ चुंबकीय गुणधर्म असणारे गोल्ड नॅनो पार्टिकल्स व त्यावर ॲन्टिकॅन्सर व ॲन्टिबॅक्‍टेरियल गुणधर्म असणारा आयुर्वेदिक पदार्थ कुरक्‍युमिन (हळद) यांचे संयुग तयार करण्यात आले. 

▪️ हे नॅनो संयुग चुंबकीय ऊर्जा आणि लेझर किरणांच्या मदतीने सक्रिय करून कर्करोगाची गाठ (ट्युमर) आणि प्रतिजैविकाला विरोध करणारे बॅक्‍टेरिया या दोघांनाही 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 100 टक्के निष्क्रिय करण्यात येते. 

Advertisement

▪️ या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय ऊर्जेचा वापर करून हे नॅनो संयुग शरीरात गाठ असलेल्या ठिकाणी अडथळ्याविना पाेहाेचते. स्वित्झर्लंडमधील प्राण्यांच्या प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.

🗣️ डॉ.नानासाहेब थोरात म्हणाले..

Advertisement

“नॅनोकार्गो’ संशोधन प्रकल्पात नॅनो टेक्‍नॉलॉजी, आयुर्वेद व लेझर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्र करून, दोन्ही आजारांवर एकच प्रभावी उपचार पद्धती शोधण्यात आली आहे. या उपचार पद्धतीमुळे कर्करोगाची गाठ (ट्यूमर) केवळ 30 मिनिटांत निष्क्रिय होत असल्याचे थोरात यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाचा फायदा भारतीयांना व्हावा, यासाठी युरोपीयन कमिशनसाेबत तंत्रज्ञान हस्तांतरण करून भारतात स्टार्टअप कंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता मिळविली आहे. भारतीय कंपनी नियामक मंडळाकडे नोंदणी करून हे तंत्रज्ञान भारतीय हेल्थ मार्केटमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, असे ते म्हणाले.

Advertisement

Leave a Reply