SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🐶 कुत्रीला 5 पिल्लं झाली म्हणून आनंदाच्या भरात कुत्रीच्या मालकाने दिलं 12 गावातील लोकांना गावजेवण

🐕‍🦺 मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यामधील एका वेगळ्याच कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. येथील एका पाळीव कुत्रीने 5 पिल्लांना जन्म दिला म्हणून कुत्रीच्या मालकाने चक्क तब्बल 12 गावातील लोकांसाठी जंगी समारंभ आयोजित केला.

💁🏻‍♂️ ‘असं’ ठरलं नियोजन..

Advertisement

📌 जुली नावाच्या पाळीव कुत्रीने 5 पिल्लांना जन्म दिल्यानंतर मालकाला खूपच आनंद झाला. आपल्या कुत्रीने 5 पिल्लांना जन्म दिल्याच्या आनंदात या मालकाने आसपासच्या गावातील लोकांसाठी जेवणाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.

📌 ‘मुस्तफा खान’ असं या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कुत्रीच्या मालकाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. ही घटना सतना जिल्ह्यातील खोही गावात घडली आहे.

Advertisement

🍽️ तब्बल 12 गावांतील लोकांना जेवण –

▪️ गावकरी आणि कुटुंबियांनी या कुत्रीच्या मालकाच्या या आगळ्यावेगळ्या इच्छेचा मान राखत महाभोजनाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरु केली. 12 गावांमधील जवळजवळ 2,000 जणांना या महाभोजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

Advertisement

▪️ या कार्यक्रमात 12 गावातील लोकांना आमंत्रण देण्यात आलं, तसंच समारंभात कुत्रीचं कौतुक करण्याबरोबरच महाभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं होतं.

▪️ ऑर्केस्ट्रा, डान्स यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंद लुटण्यासाठी, नुकत्याच जन्मलेल्या कुत्रीच्या पिल्लांना आशिर्वाद देण्यासाठी पाहुण्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

▪️ लोकांनाही या कार्यक्रमामध्ये येऊन जेवणाचा आनंद घेतला आणि कुत्रीला तसेच तिच्या पिल्लांना भरभरुन आशिर्वाद दिले. या कार्यक्रमानिमित्त जुलीला आकर्षक कपडे शिवण्यात आले होते.

▪️ या कार्यक्रमामध्ये ढोल वाजवून तसेच आलेल्यांना नाचता यावं म्हणून ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आलं होतं. लोकांनी या कार्यक्रमातील सर्वच गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला.

Advertisement

🧐 कुत्र्यांना विशेष मान का ?

मध्यप्रदेशातील या गावामध्ये एक दंतकथा सांगितली जाते. या कथेनुसार या भागात एकदा अन्न टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली. भूकबळीने गावकरी धास्तावले होते. त्यावेळी गावातील कुत्र्यांनी भगवान गैबीनाथ यांच्याकडे प्रार्थना केली होती. त्यानंतरच येथील अन्न टंचाई नाहीशी झाली. तेव्हापासून या गावातील लोकं कुत्र्यांना विशेष सन्मान देतात आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगतात.

Advertisement