SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 आयपीएल 2021 साठी खेळाडूंच्या लिलावाची ‘ही’ तारीख ठरली!

💁🏻‍♀️ आयपीएल या क्रिकेट लीगची वाट जगभरात सगळे क्रिकेट चाहते पाहत असतात. भारतामध्ये देखील आयपीएल ची वाट बघणारे अनेक क्रिकेटप्रेमी आहेत. यात खेळाडूंचा लिलाव कधी होणार आणि कधी पुढचा हंगाम आपल्या भेटीला येणार याची आतुरतेने सगळेच वाट बघत होते. आता ‘ती’ तारीख ठरली आहे!

😷 भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.

Advertisement

📢 तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आयपीएल 2021साठी खेळाडूंचा लिलाव होणार हे सांगण्यात आलं होते.

🗓️ फेब्रुवारीच्या 18 तारखेला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा आयपीएलने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. करार मुक्त झालेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला प्राप्त झाल्यानंतर आयपीएलने आता लिलावाची तारीख जाहीर केली आहे.

Advertisement