Take a fresh look at your lifestyle.

👌🏻 जमिनीवर बसून जेवण्याचे ‘हे’ आहेत काही आश्चर्यकारक फायदे!

0

🍛 भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या शरीराचा आणि आरोग्याचा विचार केलेला आहे. आपल्या जेवणाच्या पद्धतीपासून ते ताटामध्ये कोणता पदार्थ कुठे असावा इथपर्यंत शास्त्र जोडलेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जमिनीवर बसून जेवण्याचे नेमके फायदे कोणते?

👍 जमिनीवर बसल्याने शरीर नैसर्गिक अवस्थेत राहते. याला आयुर्वेदात सुखासन असे नाव आहे. नैसर्गिक अवस्थेत शरीर असल्यानंतर आपण जे खातो ते शरीराला व्यवस्थित पचन करण्यास उपयुक्त ठरते.

Advertisement

🧘‍♂️ फरशीवर बसून जेवल्याने पाठीचा खालचा भाग ताठ राहतो आणि व्यवस्थित ताणला जातो. मात्र, खुर्चीवर बसल्याने शरीराची हालचाल होत नाही.

🍱 पाठीचा कणा ताठ ठेवून जेवल्याने, अन्न व्यवस्थित पचन होते. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.

Advertisement

💪🏻 या दरम्यान शरीराच्या खालच्या भागातील मांसपेशी नैसर्गिकरीत्या ताणल्या जातात. यामुळे त्या मजबूत देखील होतात.

💁🏻‍♀️ पाठ ताठ राहिल्याने मणक्याचे हाड मजबूत होते आणि शरीराचे संतुलन टिकून राहते. यामुळे व्यक्तिमत्वातही सुधारणा होते.

Advertisement

🫀 तसेच रक्त परीसंचरण सुरळीत राहिल्याने हृदय निरोगी राहते. यामुळे हृदयासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.

🦵मांडी घालून बसल्याने गुडघ्यांचा व्यायाम देखील होतो. यामुळे पायाची हाडे मजबूत होतात.

Advertisement

Leave a Reply