SpreadIt News | Digital Newspaper

😳 शेतकरी आंदोलनाबद्दल ‘ते’ वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रँण्डने तोडला करार

0

🚜 दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे.

✊ प्रकरण काय?

Advertisement

▪️ शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे 6 मोठ्या ब्रॅण्डने तिच्यासोबतचा करार रद्द केला आहे. याविषयी कंगनाने ट्विट करुन माहिती दिली आहे.

▪️ 26 जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. या प्रकरणावर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत, ‘स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका’, असं तिने म्हटलं होतं.

Advertisement

🗣️ कंगनाचं वक्तव्य: “तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला ब्रॅंड अँबेसेडर( सदिच्छादूत) करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालेल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

📍 दरम्यान, कंगना सध्या तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हे चित्रीकरण सुरु असताना भोपाळमध्ये तिला एका आंदोलनाचा सामना करावा लागला. चित्रीकरण सुरु असताना एका राजकीय गटाने कंगनाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली होती. ‘कंगनाने भोपाळमधून निघून जावं’, अशी मागणी या आंदोलकांनी केली होती.

Advertisement