SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔥 मुंबईच्या ‘या’ परिसरात भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू!

👉 भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला भीषण आग लागली असून, घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल.

🧐 नेमके प्रकरण काय?

Advertisement

😱 सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज पहाटे भीषण आग. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाल्याची माहिती समोर.

🚒 कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी दोन मजली असून पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Advertisement

😟 या आगीत, संपूर्ण बिल्डिंगमध्ये आग पसरली असून, आगीचे लोळ सर्वत्र पसरले तर या प्रकरणी मोठा भडका उडाल्याचं शक्यता आहे.

📍 दरम्यान, आगीमुळे कंपनीतील कोट्यवधी रुपयांची सामानाचे नुकसान झाले असून मोठी वित्तहानी झाली आहे. तर ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Advertisement