Take a fresh look at your lifestyle.

😱 खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर घृणास्पद उल्लेख ; गृहमंत्री देशमुखांनी दिला कारवाईचा इशारा

0

✍🏻 रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या बेवसाईटवर त्यांची ओळख वाईट शब्दात करण्यात आल्याचे स्क्रीनशॅाट समाज माध्यमावर व्हायरल झाले होते.

🧐 याप्रकरणावर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘हे अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसल्याची’ प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आता कारवाईचा इशारा दिला आहे.

Advertisement

💁🏻‍♂️ प्रकरण ‘असं’ घडलं..

▪️ पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी स्क्रीनशॉट जोडत एक ट्वीट केलं आहे. भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच ‘गे’ समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना या ट्वीटमध्ये टॅग केले आहे.

Advertisement

▪️ त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट करून हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

▪️ माहितीनुसार, खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर अशा प्रकारचा उल्लेख होणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तरी पत्रकार स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मात्र भाजपने अद्याप आपल्याकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

Leave a Reply