SpreadIt News | Digital Newspaper

🎭 चित्रपटगृहे, स्विमिंग पूलमध्ये सर्वांना जाण्यास केंद्राची परवानगी!

0

🏊 चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

🔰 गृह मंत्रालयाने नवीन एसओपी केली जाहीर –

Advertisement

1️⃣ निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश 1 फेब्रुवारीपासून लागू असणार आहेत.

2️⃣ सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल.

Advertisement

3️⃣ सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

4️⃣ सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकार मास्क आणि सोशल डिस्टसिंगसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतील.

Advertisement

5️⃣ जिल्हा, पोलिस आणि नगरपालिकेचे अधिकारी कंटेनमेंट झोननमध्ये सर्व उपाय योजना लागू करण्यासाठी जबाबदार असतील. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सरकार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देतील.

6️⃣ 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, प्रेग्नंट महिला आणि 10 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सतर्कतेने राहावे लागेल.

Advertisement

7️⃣ पॅसेंजर ट्रेन, शाळा, हॉटेल आणि रेस्टोरेंटसारख्या ठिकाणांसाठी यापूर्वीच एसओपी जारी केली आहे. त्याचे पालन करावे लागेल.

8️⃣ राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. तसेच आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

Advertisement