SpreadIt News | Digital Newspaper

🛕 काय होते कोल्हापूरचे एक हजार वर्षांपूर्वी चे नाव आणि त्याचा इतिहास जाणून घ्या!

0

💐तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तर कोल्हापूरची आई अंबाबाई हे महाराष्ट्राचे शक्तिस्थान आहे.

🗓️ इसवी सन 9 व्या शतकाच्या दरम्यान महालक्ष्मीच्या देवालयाची पूर्तता झाली. चालुक्य राजवंशातील राजा कर्णदेव यांनी इसवी सन 634 मध्ये श्री महालक्ष्मीचे देवालय बांधले.

Advertisement

💁🏻‍♀️ परंतु, या देवालयाचे बांधकाम बरेच दिवस चालू होते. हे देवालय एकाचवेळी व एकाच राजाने न बांधता वेळोवेळी अनेकांनी त्यांची वाढ केली किंवा त्यात सुधारणा केली. देवालयाच्या पूर्णतेनंतरच कोल्हापूरच्या उत्कर्षास सुरूवात झाली.

📖 अनेक ग्रंथांमध्ये कोल्हापूरचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने आढळतो. ब्रह्मपुरी, करवीर, पद्मालय! कोल्हापूरचं जुनं नाव हे ‘पद्मालय’ असं होतं. पद्मालय हे नाव कशावरून आलं? हे आपण पाहुयात:

Advertisement

🙏 आज जे महालक्ष्मीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. ते मंदिर इसवी सन 1050 पर्यंत देवी पद्मावतीचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं.

ℹ️ पद्मालय याचा अर्थ असा की, देवी पद्मावतीचं निवासस्थान. सन 1050 नंतर शिलाहारांच्या काळात तिथे देवी महालक्ष्मीची पूजा होऊ लागली.

Advertisement