🚜 दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.
👨🏻🌾 गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत या निर्णयाचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.
📲 आतापर्यंत काश्मीरमध्ये आपातकालीन प्रसंगात असंतोष पसरु नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा पर्याय सर्रास अवलंबिला जातो. यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावेळीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.