SpreadIt News | Digital Newspaper

💉 कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुष्परिणाम झाला तर मिळणार विमा संरक्षण!

0

😷 कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचा काही दुष्परिणाम झाला आणि रुग्णाला अस्वस्थ वाटू लागलं तर त्याच्या उपचारांचा खर्च आरोग्य विम्यात क्लेम करता येईल. मनी कंट्रोल कडून अशा आशयाचे वृत्त दिले गेले आहे.

🏥 कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर त्याचा खर्च विम्याच्या रकमेतून वसूल करता येईल. अशा रुग्णांच्या उपचारांचा खर्च आरोग्य विम्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्यास रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, ही बाब आरोग्य विम्यात समाविष्ट करण्यात येईल, असा दावा एका नाॅन लाईफ इन्श्युरन्स कंपनीने केला आहे.

💰 कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी विम्याचे कवच देण्याचा निर्णय दि जनरल इन्श्युरन्स कौन्सिलने इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॅरिटी आफ इंडिया (आयआरडीएआय) ला कळविला आहे.

Advertisement

ℹ️ पाॅलिसीतील नियमित अटी विमाधारकाला लागू असतील, त्या व्यतिरिक्त लसीमुळे दुष्परिणाम झाल्यास किमान 24 तास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशी अट या आरोग्य विम्यासाठी आहे.

Advertisement