🚜 प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानच्या ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत व आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
💁🏻♂️ दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार,
▪️ पूर्व दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यामध्ये 83 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
▪️ तसेच दिल्ली पोलिसांनी (ईस्टर्न रेंज) सांगितले की, 8 बस आणि 17 खासगी वाहनांचीही तोडफोड होऊन नुकसान झाले आहे.
▪️ शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे. अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलिस यांच्यात सहमती झाली होती.
▪️ निषेध करणार्या शेतकर्यांनी ‘ट्रॅक्टर परेड’साठी मान्य केलेल्या अटींचे उल्लंघन केले. आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात 83 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
▪️ अश्रुधुराचे गोळे डागून पोलिसांनी आंदोलकांच्या जमावाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात बसेस आणि पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहनांचे नुकसान झाले.
📍 दरम्यान, हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.