SpreadIt News | Digital Newspaper

🇮🇳 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा करतात..?

0

👏 देशात आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत.

💁🏻‍♂️ राजपथावर ‘असा’ साजरा होणार प्रजासत्ताक दिन –

Advertisement

▪️ झेंडावंदनाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता सुरू होऊन यानंतर सकाळी 9 वाजता परेडला सुरूवात झाली आहे.

▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परेड विजय चौकातून सुरू होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंत जाणार आहे.

Advertisement

▪️ सकाळी 11.30 पर्यंत परेड सुरू राहील. दरवर्षी ही परेड राजपथापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाते.

▪️ राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement

🎊 …म्हणून 26 जानेवारीलाच साजरा करतात ‘प्रजासत्ताक दिन’ –

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. तेव्हापासून भारत एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Advertisement

🎖️ महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव, देशात तिसरं स्थान – दरवर्षी केंद्र सरकार पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव आज प्रजासत्ताक दिनी होणार असून यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

Advertisement