SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

👌 व्हॉट्सॲपमध्ये आलं ‘हे’ भन्नाट फीचर, चॅटिंगची मजा होणार दुप्पट !

💬 व्हॉट्सॲप चॅटिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी नवीन नवीन फीचर आणत आहे. या यादीत आता व्हॉट्सॲपमध्ये स्टिकर शॉर्टकट Sticker Shortcut नावाचे एक फीचर येण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲपमध्ये हे फीचर लवकरच ग्लोबल युजर्संसाठी रोलआउट केले जाऊ शकते.

💁🏻‍♂️ WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार,

Advertisement

▪️ हे फीचर चॅट बारमध्ये पाहायला मिळू शकते. रोलआउट झाल्यानंतर युजर्सला चॅट बारमध्ये इमोजी एन्टर करण्यासाठी किंवा कोणताही शब्द लिहिल्यावर वेगळ्या रंगात वेगवेगळे आयकॉन दिसतील.

▪️ तर कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर व्हॉट्सॲपचे सर्व स्टीकर पाहता येतील.

Advertisement

▪️ कंपनी या फीचरला आता अँड्रॉयड डिव्हाइससाठी तयार करीत आहे. लवकरच या फीचरला व्हॉट्सॲप बीटा युजर्ससाठी रोलआउट केले जाऊ शकते.

▪️ स्टिकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस बेस्ड ॲप्ससाठी नवीन ॲनिमेटेड स्टिकर पॅकला रिलीज केले आहे.

Advertisement

▪️ हे फीचर व्हॉट्सॲप वेबसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 1.4 एमबी साइजच्या या स्टिकर पॅकचे नाव Sumikkogurashi आहे.

▪️जगभरात व्हॉट्सॲप युजर या फीचरला व्हॉट्सॲप स्टिकर स्टोर वरून डाऊनलोड करु शकतात.

Advertisement